भाजपा चित्रपट आघाडीच्या जिल्हा सचिवपदी यशवंत माधव

*⚡बांदा ता.१८-:* चित्रपट क्षेत्रात काम करत आघाडीवर असलेले सिंधुदुर्गातील तडफदार अभिनेता म्हणून ओळख निर्माण झालेले मडुरा गावचे सुपुत्र यशवंत माधव यांची भाजपा चित्रपट कामगार आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, नवनिर्वाचित चित्रपट आघाडी जिल्हाध्यक्ष संतोष रामचंद्र तेली यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र देण्यात आले.सामाजिक व चित्रपट कामगार अशा विविध क्षेत्रातील सहभाग बघता यशवंत माधव यांची सिंधुदुर्ग जिल्ह्या सचिवपदी नियुक्ती केल्याचे राजन तेली यांनी सांगितले. यशवंत माधव म्हणाले की, आपल्या संघटनेचे विचार, कार्य, ध्येय ,धोरणे व विविध उपक्रम आपण वेळोवेळी लोकांपर्यंत पोहोचवणार. राज्यात आपली संघटना अधिक बळकट करण्यासाठी व संघटनवाढीसाठी नेहमीच प्रयत्नशील राहणार तसेच कामगार व कलाकारांचे समस्या व संघटनेस दिलेले कार्यक्रम, कामगारांचे शाश्वत विकासासाठी राबवून देशाच्या सर्वांगीण प्रगती मध्ये चित्रपटातील कामगार व कलाकार वर्गाचे स्थान अधोरेखित करणार असल्याचे यशवंत माधव यांनी सांगितले.

You cannot copy content of this page