युवा उद्योजक विशाल परब यांचा वाढदिवस साजरा

माजी खासदार निलेश राणे यांनी केले अभिष्टचिंतन

*⚡सावंतवाडी ता.१६-:* भाजपचे युवा नेते तथा युवा उद्योजक विशाल परब यांचा वाढदिवस सावंतवाडी येथे माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत सावंतवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी केक कापून उत्साहात पार पडला.विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना काळात आपल्या जीवाची बाजी लावत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कोरोना योध्यांचा सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विविध स्तरातील मान्यवरांनी उपस्थित राहून, विशाल परब यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या निवासस्थानी करण्यात आलेली विद्युत् रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल पथक सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. यावेळी नगराध्यक्ष संजू परब, आनंद शिरवलकर, विनायक राणे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page