मोती तलावात बदक सोडणे उपक्रमाचा निलेश राणे यांच्या उपस्थितीत शुभारंभ

पर्यटन व्यावसायिक महासंघाने केलेल्या मागणीची नगराध्यक्ष संजू परब यांनी केली पूर्तता

*⚡सावंतवाडी ता.१५-:* सावंतवाडी शहरातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मोती तलावात सावंतवाडी नगरपरिषदेच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या तलावात बदक सोडणे उपक्रमाचा शुभारंभ आज भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी नगराध्यक्ष संजू परब, भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर पाणीपुरवठा सभापती उदय नाईक, नगरसेवक राजू बेग, मनोज नाईक, आनंद नेवगी, दीपाली भालेकर, पर्यटन महासंघाचे कार्याध्यक्ष सतीश पाटणकर, डी. के. सावंत, जितेंद्र पंडित, दिलीप भालेकर, आनंद शिरवलकर, बांदा सरपंच अक्रम खान, बंटी पुरोहित, मकरंद तोरसकर, केतन आजगावकर, संजय नाईक, अँड. अनिल निरवडेकर, सत्या बांदेकर आदींसह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. . सावंतवाडी तालुका पर्यटन व्यावसायिक महासंघाने नगराध्यक्ष संजू परब यांच्याकडे तलावात बदक सोडण्याबाबत मागणी केली होती. या मागणीची पूर्तता नगराध्यक्ष संजू परब यांनी केल्याने पर्यटन महासंघाच्या मागणीला अखेर यश आले आहे. याबद्दल सावंतवाडी तालुका पर्यटन व्यावसायिक महासंघाने त्यांचे आभार मानले. सावंतवाडी शहरात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी तलावात संचार करणाऱ्या या बदकांचा निश्चितच उपयोग होईल असा विश्वासही पर्यटन व्यावसायिक महासंघाचे तालुकाध्यक्ष जितेंद्र पंडीत यांनी व्यक्त केला. बदकांच्या अदा मोबाईल मध्ये टीपण्यासाठी तलावाकाठी नागरिकांनी गर्दी केली होती

You cannot copy content of this page