वेत्ये येथील जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत स्वराभिषेक भजन मंडळ मणेरी भजनमंडळ प्रथम

*⚡सावंतवाडी ता.१५-:* कलेश्वर कला क्रीडा मंडळ वेत्येच्यावतीने नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेत स्वराभिषेक भजन मंडळ मणेरी याभजनमंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला. श्री कलेश्वर कला क्रीडा मंडळ वेत्येच्यावतीने नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आयोजित केलेल्या. जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत जिल्ह्यतील एकूण १३ संघ सहभागी झाले होते. सर्वच भजन मंडळांनी सुरेख अशी भजने सादर केली. स्पर्धेत द्वितीय क्रमांक दत्तगुरू भजन मंडळ वैभववाडी, तृतीय क्रमांक स्वरधारा भजन मंडळ तांबोळी यांना देण्यात आला. स्पर्धेत उत्तेजनार्थ प्रथम निवजेश्वर भजन मंडळ निवजे, उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ पिंगुळी यांना बहाल करण्यात आला. वैयक्तिक परितोषिकात उत्कृष्ट गायक-गितेश कांबळे मणेरी, उत्कृष्ट पखवाज-महेल कांडरकर तळवडे, उत्कृष्ट तबला-ओमकार तळवणेकर सांगेली, उत्कृष्ट हार्मोनियम-समीर नाईक मणेरी, उत्कृष्ट झांज-शिवराम सावळ मातोंड यांना तर उत्कृष्ट कोरस स्वामी समर्थ भजन मंडळ कलंबिस्त संघाला देण्यात आला.

You cannot copy content of this page