जागतिक सायकलपटु सतीश आंबेरकर यांचे प्रतिपादन
*⚡कणकवली ता.१६-:* ऑस्ट्रेलियामध्ये प्रत्येक सन्डे व्हिकला गावागावातील लहान मुलांबरोबर त्यांचे पालक मोठ्या संख्येने सायकलसफर करतात.त्यामुळे त्या देशातील लोक शारिरिकदृष्टया सदृढ असतात याचा विचार अमलात आणून सिंधुदुर्गात सायकल पर्यटनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात करावा असे आवाहन जागतिक कीर्तीचे सायकलपटु सतीश आंबेरकर यांनी केले आहे. कनक रायडर्स कणकवली मंडळ,संजना टूर्स अँड ट्रव्हलर्स,आणि सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन विकास संस्था फेडरेशनचे अध्यक्ष चंद्रशेखर उपरकर व नंदकुमार आरोलकर यांनी कणकवली येथील भवानी सभागृहात आयोजित केलेल्या शानदार सत्कार समारंभाच्या वेळी बोलताना श्सतीश आंबेरकर म्हणाले, आम्ही चार सायकलपटुनी सुमारे 320 दिवसात 24 देशांतुन आंतरराष्ट्रीय सायकलसफर केली.ती केवळ जिद्द,ईच्छा शक्ती आणि मेहनतीच्या जोरावर.परंतु जागतिक सायकलने प्रवास करण्यापुर्वी त्याचे नियोजन आम्ही 3 वर्षे अगोदर केले होते. प्रवासात येणारी भाषेची अडचण दूर करण्यासाठी इंग्रजी,फ्रेंच भाषेसह अन्य 4 भाषा शिकुन घेतल्या.खाणया पिण्याच्या सवयी सुद्धा समजून घेतल्या होत्या .इराण-इराक युद्धा मुळे व रशिया,पाकिस्तानात परवानगी अभावी आम्ही तिथे जाऊ शकलो नाही तर पूर्व -पश्चिम जर्मनीच्या एकत्रीकरण करण्यापुर्वी तोडलेल्या भिंतीची वीट सुद्धा आपल्या जागतिक सायकल सफरीची साक्ष असल्याचे भावनात्मक उदगारही त्यांनी व्यक्त केले.सायकलिंगमुळे प्रकृती सृदृढ़ राहण्यास मदत होते.अनेक लोक जगप्रवासासाठी विमानाने अथवा बोटिने प्रवास करणे पसंद करतात परंतु आम्ही असा प्रवास सायकलने करण्याचा निर्णय घेतला .त्यावेळी म्हणजेच 1989 साली मोबाईल, इंटरनेट वगैरे आताच्या सारखी कोणतीही सुविधा नव्हती तसेच त्याकाळात खेळासाठी किंवा अशा विशेष मोहिमेसाठी कोणत्याही आर्थिक आणि इतर सुविधा पुरविणाऱ्या संस्था नव्हत्या. या जागतिक भ्रमंतीच्या अनुभवातून त्यांनी “दोन चाकं झपाटलेली “हे पुस्तकही लिहिलं असून त्या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तिच्या 1000 प्रति जगभरातून विकल्या गेल्यामुळे ते आता पुस्तकाची दूसरी आवृत्ती प्रकाशित करणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाबत ते म्हणाले कि, पर्यटनासाठी सिंधुदुर्ग सारखा निसर्गसंपन्न प्रदेश कुठलाही नाही शिवाय आपल्या सारखं जेवण खाद्य संस्कृति जगात कुठेही नाही.म्हणून इथे सर्व मूलभूत सोयी सुविधा मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्यास लोक वर्षभर पर्यटनातील विविध प्रकारचा आस्वाद घेऊ शकतील. सायकलिंग बरोबरच तंबू निवासाची संकल्पना राबविल्यास त्याचा जास्तीत जास्त लाभ पर्यटक आणि स्थानिक लोकांना होऊ शकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाच्या प्रसंगी कनक रायडर्सचे मकरंद वायंगणकर,यशवंत भोसले,सौ.संजना काकडे, संतोष काकडे,रविंद्र सावंत,संजय बिडये, कैलास सावंत,पुण्याचे नितीन बांदेकर, नंदू आरोलकर, तसेच सायकल पटु , पत्रकार,मीडिया प्रमुख व पर्यटन प्रेमी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्र संचलन चंद्रशेखर उपरकर यानी केले तर आभार प्रदर्शन योगेश महाडिक यानी केले.