वेंगुर्ला प्रतिनिधी – केंद्रशाळा वेंगुर्ला नं.१ या शाळेला आवश्यक असलेल्या स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या पुढाकाराने शाळेला स्वतःची विहीर व्हावी, यासाठी गेल्या काही महिन्यांपासून केलेल्या प्रयत्नातून अखेर विहिर पुर्णत्वास आली. या विहिरीचा लोकार्पण सोहळा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सत्यवान साटेलकर यांच्या हस्ते व सर्व सदस्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
या विहिरीसाठी शासनाकडून निधी प्राप्त होत नसल्याने समाजातील काही उद्योजक दाते, माजी विद्यार्थी, शिक्षक-पालक यांच्या आर्थिक सहकार्यातून १ मे रोजी विहिर बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. दरम्यान, ७ जुलै रोजी पुरोहितांमार्फत विधीवत या विहिरीचे पूजन करून लोकार्पण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक ज्ञानेश्वर हरमलकर, उपाध्यक्ष राकेश सापळे, पुरोहित अजित दामले, अण्णा नाईक, समिती सदस्य संजय पिळणकर, स्नेहल बागडे, विनिता सामंत, समीर परब, माजी अध्यक्ष राजन केरकर, गायत्री मिशाळे, स्मिता परब, मयुरी केरकर यांसह सर्व शिक्षक-पालक व विद्यार्थी उपस्थित होते. शाळा व्यवस्थापन समित्तीच्यावतीने सर्व दात्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
फोटोओळी – केंद्रशाळा नं.१च्या नूतन विहिरीचे लोकार्पण करण्यात आले.
नुतन पिण्याच्या पाण्याच्या विहिरीचे लोकार्पण संपन्न…!
