*⚡बांदा ता.०८-:* काेराेना महामारीच्या गेल्या दाेन वर्षात चालु असलेल्या संकटातुन संपुर्ण देश सावरत आहे. या पार्श्वभूमीवर घटस्थापनेपासुन दसऱ्यापर्यंत बांदा येथील कै बाप्पा केसरकर यांच्या साईमंदिरात बाबांचा पुण्यतीथी उत्सव साजरा हाेत आहे. यामध्ये साईचरीत्र वाचन, भजन, महाआरती असे धार्मिक कार्यक्रम साजरे करण्यात येणार आहेत. यामध्ये खास 20 वर्षावरील महिला वर्गासाठी साेमवार दि.11 ऑक्टोबर राेजी सायंकाळी 7 वा. श्री साईबाबा भक्त सेवा मंडळच्यावतीने कै. साै.अनघा पांडुरंग स्वार यांच्या स्मरणार्थ अभंग व भक्ती गीत गायन स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले आहे. या स्पर्थेचे प्रथम पारीताेषीक 3000/- राेख व चषक, द्वितीय क्र. 2000/ राेख व चषक, तृतीय क्र. 1000/ राेख व चषक तसेच उत्तेजनार्थ आकर्षक बक्षिसे सर्व पारितोषिके अनय पाडुरंग स्वार, अंकीता अनय स्वार यानी पुरस्कृत केली आहे. या स्पर्थेत महिला वर्गाने सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष राकेश केसरकर यानी केले आहे. स्पर्धेसाठी दर्शना केसरकर (7378740842), प्रियांका प्रितम हरमलकर (8411818167), राजश्री गुरूनाथ तेडंले (9765314426) यांच्याशी संपर्क साधावा.
बांद्यात महिलांसाठी 11 रोजी भक्तीगीत व अभंग गायन स्पर्धा
