जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजू मसुरकर यांचा टोला
*⚡सावंतवाडी ता.०८- :* चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या शुभारंभाला माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांना प्रशासनाने निमंत्रण न दिल्याने सर्वसामान्य जनतेमध्ये नाराजी पसरली असून यामागे राजकीय षडयंत्र आहे का ? असा सवाल जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजू मसुरकर यांनी व्यक्त केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विमानतळाच्या उद्घाटनाचे शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व केंद्रीय विमान उड्डाण मंत्री ज्योतीराज्य सिंधिया यांच्या शुभहस्ते होणार असून याप्रसंगी माजी खासदार व काँग्रेसचे माजी ऑल इंडिया काँग्रेस सरचिटणीस सुधीर सावंत यांना शुभारंभाला प्रशासनाकडून निमंत्रण न दिल्याने नाराजी पसरली आहे. 1995 मध्ये काँग्रेस पक्षाचे त्या काळातील पंतप्रधान नरसिंहराव असताना त्या काळातील तत्कालीन खासदार सुधीर सावंत असताना 1992-93 सालामध्ये देशात अतिरेक्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणले होते. त्यामुळे देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आता असलेले उत्तर गोव्यामध्ये दाभोळी विमानतळ हे नेवी या सैनिकी विमानतळावरती प्रवासी विमाने उतरून आजपर्यंत ते चालू असल्याने देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने मेजर व आता असलेले ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी तत्कालीन विमान उड्डाण मंत्री व पर्यटन मंत्री यांना कै माधवराव सिंधिया यांच्याकडे मागणी करून गोव्याच्या विमानतळाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे विमानतळ सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चिपी येथे व्हावे अशा प्रकारची मागणी करुन, सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा व्हावा यासाठी सुधीर सावंत यांनी मागणी करून माधवराव सिंधिया यांच्याकडून घोषित करून मंजूर करून घेण्यात आले होते.
नंतरच्या कालावधीमध्ये त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुंबईवरून हेलिकॉप्टरद्वारे या पर्यटन जिल्ह्याची पाहणी करून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी तत्कालीन खासदार सुधीर सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी इंटरनॅशनल विमानतळ व्हावे व त्यासाठी विमानतळाला लागणारी हवी तशी उपलब्ध असणारी जागा त्यांनी ते विमानतळ तत्कालीन केंद्रीय मंत्री माधवराव सिंधिया यांच्याकडून मंजूर करून घेतली.यासाठी केंद्रीय पथक जागेची पाहणी करण्यासाठी विमान उड्डाण अॅथोरिटी चे अधिकारी यांनी चिपी विमानतळाच्या जागेची पाहणी केल्यानंतर त्याचा अहवाल केंद्र सरकारला पाठवून त्यानंतर ते चिपी विमानतळ अधिकृतरित्या मंजुरी देण्यात आली.त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात हे इंटरनॅशनल विमानतळ गोव्या मधून जाणार म्हणून सर्व गोव्यातील जनतेने तीव्र आंदोलने करून सिंधुदुर्ग जिल्ह्यालगत बांदा पत्रदेवी पासून चार पाच किलोमीटर असलेली गोवा राज्यातील मोफा विमानतळाची जागा त्यावेळच्या सरकारने सुचवून व जागा दाखवून इंटरनॅशनल विमानतळ गोवा मोफा येथे मंजूर करून घेतले.
त्यामुळे दीडशे किलोमीटरच्या आत दोन इंटरनॅशनल एअरपोर्ट होऊ शकत नाही हे ओळखून गोवा सरकारने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इंटरनॅशनल एअरपोर्ट व्हावे या ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या स्वप्नाला धूळ चारली गेली.
त्यानंतरच्या काळामध्ये विविध पक्षातील राजकीय नेत्यांनी हे विमानतळ पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न केला असून यासाठी सर्व पक्षातील राजकीय नेतेमंडळींनी या विमानतळाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेचे स्वप्न साकार होण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, शुभारंभ प्रसंगी ब्रिगेडियर माजी खासदार सुधीर सावंत यांना प्रशासनाने निमंत्रण न देणे हे खेदजनक असून ज्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेचे स्वप्न साकार होण्यासाठी आंबा, काजू तसेच मत्स्य पर्यटन तसेच आपल्या लोकांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी साकारलेले स्वप्न काँग्रेस पक्षाचे तत्कालीन खासदार सुधीर सावंत यांना या विमानतळाच्या शुभारंभाला आमंत्रण न देणे हे योग्य नसुन यामागचे राजकीय षडयंत्र आहे अशी शंका सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजू मसुरकर यांनी व्यक्त केली आहे.
