वेंगुर्ला प्रतिनिधी- श्री केपादेवी देवस्थान आणि आर्युसंजिवनी फाऊंडेशन इंडिया यांच्या सौजन्याने १० ऑक्टोबर रोजी श्री केपादेवी देवस्थान उभादांडा येथे महारक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात कंबरदुखी, गुडगेदुखी, मानदुखी, पाठदुखी याबरोबरच इतर आरोग्य तपासणी केली जाणार आहे. गेली ५ वर्षे युरोप व रशिया येथील रुग्ण तपासणीचा अनुभव असलेले म्हापसा-गोवा येथील आयुर्वेदाचार्य डॉ. सिद्धेश बांदेकर हे उपस्थित राहणार आहेत.
उभादांडा येथे १० रोजी महारक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबीर
