सातरल गावच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी सदाशिव उर्फ बाबू राणे

*⚡कणकवली ता.०८-:* कणकवली तालुक्यातील सातरल गावच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी गावातील सक्रिय सामाजिक कार्यकर्ते सदाशिव उर्फ बाबू राणे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. सातरल गावची ग्रामसभा ग्रामपंचायत कार्यालय येथे आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेमध्ये तंटामुक्ती समिती अध्यक्ष म्हणून सर्वानुमते सदाशिव उर्फ बाबू राणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. गावामध्ये सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्यासाठी बाबू राणे हे सतत कार्यशील असतात. त्याचप्रमाणे गावातील प्रत्येक वेळप्रसंगी तत्परतेने धावून जातात. यामुळे या पदालाही ते योग्य प्रकारे न्याय देतील, असा गावातील लोकांचा विश्वास आहे. या निवडीमुळे गावातील सर्व ग्रामस्थांकडून व मित्रमंडळींकडून त्यांचं अभिनंदन होत आहे.

You cannot copy content of this page