चिपी विमानतळाचे लोकार्पणाचे कणकवलीत होणार लाईव्ह प्रेक्षपण

आप्पासाहेब पटवर्धन चौकात शिवसेना मोठी स्क्रीन लावणार

*⚡कणकवली ता.०८-:* चिपी-परुळे येथे उभारण्यात आलेल्या सिंधुदुर्ग विमानतळाचे शनिवार 9 ऑक्टोबरला उड्डाणासाठी सज्ज झाले आहे. याचे लोकार्पण मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चिपी विमानतळावर आयोजित केला आहे. हा ऐतिहासिक सोहळा कणकवलीवासीयांना पाहता यावा यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून सकाळी ११.०० वाजता आप्पासाहेब पटवर्धन चौकात मोठी स्क्रीन लावून त्याचे लाईव्ह प्रेक्षपण केले जाणार आहे व शिवसेनेच्या वतीने जल्लोष करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार्‍या या प्रकल्पाचा लोकर्पण सोहळा शनिवारी होणार आहे. या सोहळ्याचा प्रत्यक्ष आनंद सिंधुदुर्गवासीयांना घेता यावा यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून आप्पासाहेब पटवर्धन चौकात मोठी स्क्रीन लावून त्याचे लाईव्ह प्रेक्षपण दाखविले जाणार आहे. स्वर्गीय मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातील कोकणाच्या विकासाचे ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी नागरिकांनी हा लाईव्ह लोकार्पण सोहळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, शहरप्रमुख शेखर राणे, नगरसेवक कन्हैया पारकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page