घटस्थापने निमित्त आंबेगाव श्री देव लिंग क्षेत्रपाल मंदिरात ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाचा शुभारंभ

*⚡सावंतवाडी ता.०८-:* श्री देव लिंग क्षेत्रपाल मंदिर आंबेगाव येथे नवरात्र घटस्थापना निमित्त ३० वे सामुदायिक ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाचा शुभारंभ आज करण्यात आला. ॲड. जनादर्न सामंत , कुणकेरीचे सुपुत्र नामदेव सावंत यांच्या हस्ते या सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी श्री देव लिंग क्षेत्रपाल मंदिराच्या जीर्णद्धारासाठी ॲड. जनादर्न सामंत यांनी एक लाख रुपयाची देणगी दिली. गावच्या वतीने ॲड. जनार्दन सामंत व आदर्श पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल नितीन सावंत यांचा सत्कार करण्यात आला. गेल्या तीस वर्षापासून चालत आलेली ही ज्ञानेश्वरी पारायण परंपरा आंबेगावातील वारकरी, गावकरी अगदी मनोभावे पार पाडत आहेत. यानिमित्त रोज सकाळी काकड आरती, ज्ञानेश्वरी वाचन, अभंग प्रवचन, हरिपाठ, किर्तन भजन व इतर सांस्कृतिक कार्यक्रम सकाळपासून संध्याकाळपर्यंत सादर केले जाणार आहेत. यावेळी आंबेगाव देवस्थान कमिटी अध्यक्ष ज्ञानेश्वर परब, गावपंच नामदेव परब, पांडुरंग परब, सुरेश परब, अनिल तेली, अशोक गावडे, दिलीप गावडे, अनिल गावडे, रामचंद्र परब, न्हणू परब, उत्तम सावंत, प्रभाकर गावडे, वारकरी संप्रदाय प्रमुख लक्ष्मण कडव, मधुकर कडव, प्रकाश केळुस्कर, बाळकृष्ण गवळी, जयराम गोसावी, मंगेश आंगचेकर,संतोष राणे, सखाराम कुंभार, रामदास कडव, सावंत बुवा, लक्ष्मण गोसावी, रवींद्र यमकर तसेच आंबेगाव ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page