शिरोडा केरवाडी येथील युवकांचा मनसेत प्रवेश

राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्याहस्ते स्वीकारला झेंडा

*⚡वेंगुर्ले ता.०८-:* महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय राज साहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा केरवाडी येथील तरुण युवकांनी तसेच ग्रामस्थांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्य सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उफऺ जीजी उपरकर साहेबांच्या नेतृत्व खालील तसेच प्रमुख उपस्थिती मोठ्या संख्येने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला. त्यावेळी मनसे सिंधुदुर्ग जिल्हा सचिव बाळा पावसकर , जिल्हा उपाध्यक्ष दया मेस्त्री , विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष कुणाल किनळेकर, मनविसे उपजिल्हा अध्यक्ष आबा परब , तालुका अध्यक्ष सनी बागकर, तालुका सचिव आबा चिपकर , कुडाळ तालुका सचिव राजेश टंगसाळी , सावंतवाडी शहर अध्यक्ष आशिष सुभेदार, ग्रामपंचायत सदस्य नरेश देऊलकर आदी पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. प्रवेश कर्यक्रम प्रसंगी परशुराम उपरकर यांनी मार्गदर्शन पक्षाची ध्येयधोरणे उद्दिष्टे यांवर चर्चा केली . तसेच मस्त्य उद्योगांवर आधारित शासनाचे विविध योजनांची माहिती दीली . तसेच त्यावेळी प्रवेश कर्ते युवकांनी जिल्ह्यातील पुरग्रस्त भागात तसेच पावसाळ्यात अचानक पाणी साचण्याने त्या ठिकाणी राहणा-या जनतेवर ओठवणार्या प्रसऺगावर तसेच संकटावर मात करण्यासाठी मदत कार्य म्हणून मनसेच्या माध्यमातून आपत्ती कालीन मदत कक्ष उभारून पुरात तसेच पाण्यात अडकलेल्या लोकांना पाण्यातून बाहेर काढण्याची तसेच जीव वाचवायचे काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपत्कालीन मदत कक्षातुन करू असे आश्वासन दिले . त्यावेळी दिनानाथ तांडेल, सत्यविजय सांरग, रोहीत म्हाकले, सहदेव नार्वेकर ,विनय धुरत , दिगंबर म्हाकले , हरेश बटा , पुर्वेश उगवेकर, अजय पेडणेकर, हरी चोपडेकर, संदेश पडते , रोहन आऱोंदेकर व इतर कार्यकर्ते , महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

You cannot copy content of this page