*⚡मालवण ता.०६-:* मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात एसवायबीए साठी प्रवेश घेण्यासाठी आलेल्या नूरबानू खान या विद्यार्थिनीचे प्रवेश प्रक्रियेच्या गडबडीत गहाळ झालेले एक हजार रुपये याच महाविद्यालयाची एसवायबीएची विद्यार्थिनी हर्षदा शेलटकर हिला सापडल्यावर तिने प्रामाणिकपणे हे पैसे प्रा. खोबरे यांच्याशी संपर्क करत नूरबानू खान हिला परत केले. हर्षदा हिच्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. हर्षदा शेलटकर हिच्या या प्रामाणिकपणा बद्दल महाविद्यालयात प्राचार्या डॉ. उज्वला सामंत आणि सर्व प्राध्यापकांच्या उपस्थितीत कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंत वालावलकर यांच्या हस्ते गुलाबपुष्प आणि पुस्तक देऊन तिचा सत्कार करण्यात आला. तर पंतवालावलकर यांनी तिला रोख बक्षीस देत तिचे कौतुक केले.
महाविद्यालयीन विद्यार्थिनीने दाखविला प्रामाणिकपणा
