*⚡मालवण ता.०६-:* कोरोना महामारीमुळे बंद असलेल्या राज्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालये पुन्हा सुरू झाल्याने शासन आदेशानुसार मालवण येथील रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षणोत्सव साजरा करण्यात आला. महाविद्यालय सुरू झाल्याने वर्षभरानंतर महाविद्यालयात आलेल्या विद्यार्थ्यांचे मास्क व गुलाबपुष्प देऊन स्वागत करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी केंद्रप्रमुख अनिल खडपकर, संस्थेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, संस्था सदस्य संदेश कोयंडे, डॉ. गार्गी ओरस्कर, माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष सुधीर धुरी सदस्य नाईक साटम, प्राचार्या डॉ. उज्ज्वला सामंत, वरिष्ठ महाविद्यालय प्राध्यापक आणि शिक्षक वृंद आदी सर्वांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अन्वेशा कदम, प्रास्ताविक प्रा. स्नेहा बर्वे तर आभार प्रदर्शन प्रा. मिलन सामंत यांनी केले.
रामभाऊ परुळेकर महाविद्यालयात शिक्षणोत्सव साजरा
