कै लक्ष्मीबाई मुरारी माधव विद्यालयाला संजना सावंत यांची भेट

छप्पर कोसळल्याने केली पाहणी

*⚡सावंतवाडी ता.०-:* कै. लक्ष्मीबाई मुरारी माधव विद्यालय आदर्श पुरस्कार प्राप्त जि. प. शाळा नंबर ६ या शाळेच्या जुन्या इमारतीचा छपराचा काही भाग अतिवृष्टीमुळे पडझड झाला होता. त्या संदर्भात जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांनी भेट दिली. यावेळी बोलताना संजना सावंत म्हणाल्या की, पालक आणि स्थानिक नागरिकांची शाळेबद्दल ची तळमळ पाहून आपण भारावून गेले आहे. यावेळी नगरसेविका सौ. दिपाली भालेकर यांनी सांगितल्यावर मी शाळेच्या दुरुस्तीच्या आलेल्या प्रस्तावाचा अभ्यास करून शाळा दुरुस्तीसाठी विशेष बाब म्हणून १० लाख रुपये निधी मंजूर केला आहे. नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या अथक प्रयत्नांनी जि. प. शाळा नंबर ६ ला जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांच्याकडून दुरुस्तीसाठी दहा लाख निधी मंजूर झाला आहे. यावेळी जि.प. अध्यक्षा संजना सावंत, महिला बालकल्याण सभापती शर्वाणी गावकर, सभापती निकिता सावंत, उपसभापती शितल राऊळ, नगरसेविका दिपाली दिलीप भालेकर, दिलीप भालेकर आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. जि. प. अध्यक्षा श्रीम. संजना सावंत, महिला बालकल्याण सभापती सौ. शर्वाणी गावकर मॅडम, सभापती निकिता सावंत, उपसभापती शितल राऊळ, नगरसेविका दिपाली दिलीप भालेकर, गटविकास अधिकारी रवींद्र कणसे,पं.स.विस्तार अधिकारी येरवळकर सर, गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, केंद्रप्रमुख स्नेहा लंगवे, शाळेच्या अध्यक्षा अनिशा राणे, उपाध्यक्ष प्राप्ती राणे, दिलीप भालेकर, मुख्याध्यापक सायली लांबर, ॲड.अरुण पनदुरकर , संजय पेडणेकर, गजानन गावडे, सचिन धोपेश्वरकर, रवी नाईक, प्रसाद राणे, दत्ता हनुसवाडकर, लॉरेन डिसोजा, प्रसन्ना राणे, श्याम हळदणकर, प्रमोद भागवत, बंड्या केरकर, उदय आळवणी, सचिन साटेलकर, बाळू कशाळीकर, रवी जाधव, शेखर गावडे, सुदिन पेडणेकर, प्रदिप भालेकर, वि स खांडेकर मुख्याध्यापक राजाराम पवार, शाळेच्या शिक्षिका गीता सुतार, विजय मुद्राळे, नीलम जोशी, नीळकंठ मेस्त्री, सौ गोठस्कर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page