महिलांच्या लेदरबॉल क्रिकेट संघासाठी माजी खासदार निलेश राणे यांनी दिला मदतीचा

मध्यप्रदेशमध्ये १८ वर्षाखालील महिलांचा संघ खेळणार लेदरबॉल क्रिकेट

*⚡मालवण ता.०६-:* मालवण कुडाळ विधानसभेतील १८ वर्षाखालील महिलांच्या लेदरबॉल क्रिकेट संघासाठी भाजपचे प्रदेश सचिव व माजी खासदार निलेश राणे यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. निलेश राणे यांनी दिलेली मदतीची रक्कम मालवण तालुका भाजप पदाधिकाऱ्यांकडून या संघाला सुपूर्द करण्यात आली. मालवण कुडाळ विधानसभेतील १८ वर्षाखालील महिलांच्या लेदरबॉल क्रिकेट संघाची मध्यप्रदेश येथे पुढील सामना खेळण्यासाठी निवड झाली असून या विद्यार्थिनी सर्वसामान्य कुटुंबातील असून आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने मध्यप्रदेश मध्ये जाणे शक्य होत नव्हते. याबाबत मालवणचे माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर व नगरसेवक दीपक पाटकर यांनी भाजपा नेते निलेश राणे यांच्या कानावर ही गोष्ट घातल्यानंतर श्री. राणेनी महिला संघाच्या प्रवासाचा खर्च उचलून आर्थिक हातभार लावला आहे. आज बुधवारी मालवण भाजपा कार्यालय येथे या महिला संघाला भाजप पदाधिकाऱ्यांकडून ही आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, तालुका सचिव महेश मांजरेकर, नगरसेवक गणेश कुशे, नगरसेवक दीपक पाटकर, आप्पा लुडबे, जगदीश गावकर, नगरसेविका सौ. पूजा सरकारे, पप्पू परब , शहर मंडल प्रभारी अध्यक्ष विजय केनवडेकर, सौ. अन्वेषा आचरेकर, बाबा परब, आबा हडकर, भाऊ सामंत, पंकज पेडणेकर, बबन रेडकर, श्री. परब, अभय कदम, आदी व इतर उपस्थित होते.

You cannot copy content of this page