महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे उपनगराध्यक्ष निवडणुकीनंतर व्यक्त केली प्रतिक्रिया
*⚡वेंगुर्ले ता.०६-:* वेंगुर्ले उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या कु.शितल आंगचेकर हीने महाविकास आघाडीचे विधाता सावंत यांचा पराभव करून वेंगुर्ले नगरपरिषदेमध्ये नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष भाजपाचे झाल्यामुळे वेंगुर्ले तुन ” शत – प्रतिशत भाजपा ” ची सुरुवात झाली असे प्रतिपादन महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ.संध्या तेरसे यांनी केले . भाजपा वेंगुर्ले च्या वतीने नवनिर्वाचित उपनगराध्यक्षा कु शितल आंगचेकर हीचा सत्कार तालुका कार्यालयात महिला जिल्हाध्यक्षा सौ.संध्या तेरसे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला . यावेळी मार्गदर्शन करताना सौ.संध्या तेरसे म्हणाल्या की , भारतीय जनता पार्टीची ताकद आता पुर्ण देशात वाढत चालली असुन जनतेचे समर्थन भाजपाला मिळत आहे . विरोधक सत्तेसाठी दळभद्रया आघाड्या करत आहेत . *परंतु सिंधुदुर्गात आघाडीची बिघाडी करायचा शुभारंभ वेंगुर्ले तुन करण्यात आला* याबद्दल भाजपा – वेंगुर्ले चे अभिनंदन करण्यात आले . तसेच केंद्रीय मंत्री नारायणराव राणे साहेब यांच्या नेतृत्वामुळे कोकणच्या बदलत्या समीकरणाची झलकही त्यामुळे दिसली . वेंगुर्ले नगरपरिषदेत महाविकास आघाडीला धोबीपछाड देत भाजपा ने विजयाचा झेंडा रोवला याबद्दल भाजपा – वेंगुर्ले चे अभिनंदन केले . या सत्कार समारंभामध्ये प्रदेश का.का.सदस्य शरदजी चव्हाण , नगराध्यक्ष राजन गिरप , जि.का.का.सदस्य वसंत तांडेल ,ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर यांनी शुभेच्छा दिल्या . यावेळी सत्काराला उत्तर देताना उपनगराध्यक्षाकु शितल आंगचेकर म्हणाल्या की , मिळालेल्या संधीचे सोने करुन शहरामध्ये भाजपा वाढविण्यासाठी प्रयत्न करीन , तसेच नगरपरिषदेच्या माध्यमातून नगराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली शहरातील नागरिकांना सोयी सुविधा पुरविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीन असे सांगितले . यावेळी या सत्कार समारंभाला जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , जि.का.का.सदस्य साईप्रसाद नाईक – बाळा सावंत , नगरसेवक प्रशांत आपटे , ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडिस , ता.चिटनीस समीर चिंदरकर – समीर कुडाळकर , सोशल मिडीयाचे राजवीर पाटील , महिला जिल्हा सरचिटणीस सारीका काळसेकर , ओबीसी सेलचे रमेश नार्वेकर , परबवाडा सरपंच पपु परब , अल्पसंख्याक सेलचे सायमन आल्मेडा , महिला मोर्चा ता.सरचिटणीस व्रुंदा गवंडळकर , ता.का.का.सदस्य रविंद्र शिरसाठ – आनंद ऊर्फ बिट्टु गावडे , युवा मोर्चा शहर अध्यक्ष प्रणव वायंगणकर , युवा मोर्चा चे अमेय धुरी – राहुल मोर्डेकर – निलय नाईक , शक्ती केंद्र प्रमुख गणेश गावडे – कमलेश गावडे , वजराठ सरपंच महेश राणे , महिला मोर्चा च्या सौ. व्रुंदा मोर्डेकर – सौ.रसीका मठकर – सौ. श्रद्धा धुरी , बुथप्रमुख शेखर काणेकर , कार्यालय प्रमुख छोटु कुबल इत्यादी उपस्थित होते . सत्कार समारंभाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई यांनी केले .
