सुकी याच्या पत्राची बाधकामंत्र्याकडून दखल

महामार्गावर बचत गटांना स्टाॅल देणार : अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश

सावंतवाडी :मुंबई गोवा महामार्गा लगत सिंधुदुर्ग जिल्ह्यात महिला बचत गटांना स्टाॅल उभारण्यासाठी शासकीय जागा उपलब्ध करून द्यावी यासाठी काँग्रेस च्या प्रातिक सदस्या विभावरी सुकी यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केली होती त्या पत्राची दखल घेत मंत्री चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले असून याबाबत ची माहिती सुकी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून दिली आहे. मुंबई गोवा महामार्गावर आजू बाजू ला मोठ्याप्रमाणात जागा शिल्लक आहे या जागेत गोरगरीब बचत गटातील महिलांना नाममात्र किवा मोफत स्टॉल उपलब्ध करून दिल्यास अनेकांची चारिथीर्थ चालेल त्यामुळे बचत गटाच्या माध्यमातून स्टॉल उपलब्ध करून देण्यात यावेत अशी मागणी सुकी यानी बांधकाम मंत्र्यांकडे केली होती. या मागणी ची दखल स्वता बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी घेतली आणि तसा सर्व्हे करून अहवाल सादर करण्याचे आदेश बांधकाम च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत.याबाबत ची माहिती सुकी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून दिली आहे.

You cannot copy content of this page