*⚡बांदा ता.०६-:* दांडेली सावंतवाडी मार्गावरील न्हावेली-मोयझरवाडी येथील मोरी पुलाला सुमारे पाच ते सहा फुटी दोन भगदाड पडले आहेत. चार ते पाच दिवसांचा कालावधी उलटूनही प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने अपघाताची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे तात्काळ लक्ष देऊन तात्पुरत्या स्वरुपात तरी दुरूस्ती करावी अशी मागणी प्रवासी, वाहनचालक तसेच नागरिकांमधून होत आहे.
न्हावेली-मोयझरवाडी पुलाला भगदाड
