निवृत्त वनपाल वसंत राणे यांचे राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन

*⚡सावंतवाडी-:वनविभागाचे निवृत्त वनपाल वसंत अनंत राणे (वय ७९ ) यांचे आज दुपारी ३ वाजून ४२ मिनिटांनी वृद्धापकाळाने वैश्यवाडा येथील राहत्या घरी दुःखद निधन झाले. वेंगुर्ल तालुक्यातील वजराठ या मूळ गावी त्यांच्यावर उद्या सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. ओटवणे, कुणकेरी, फोंडाघाट, कणकवली आदि ठिकाणी त्यांनी काम केले होते. मळगावचे वनपाल प्रमोद राणे, शिक्षक तुकाराम राणे यांचे ते वडील तर सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाच्या अधिपरिचारिका सौ. प्राची राणे यांचे ते सासरे होत. त्यांच्या मागे पत्नी, २ मुले, ४ मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे .

You cannot copy content of this page