मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेरिटाईम बोर्डाला आदेश आ वैभव नाईक
मालवण दि प्रतिनिधी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा मालवण येथे बसविण्यात यावा ही गेल्या कित्येक वर्षांपासून मालवणवासीयांबरोबरच शिवप्रेमींचे स्वप्न लवकरच साकार होणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बाबतचे आदेश मेरी टाईम बोर्डाला दिल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली दरम्यान, आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून मालवण येथे बांधण्यात आलेल्या सुसज्ज बंदर जेटीचे उभारण्यात आली आहे. या बंदर जेटीचे उदघाटन ३० नोव्हेंबर पर्यंत करण्यात येणार सांगितले मुंबई येथे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या दालनामध्ये कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक व महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. अमित सैनी, एमिशनरी ऑफिसर श्री. बडये यांची मंगळवारी बैठक पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे आ. वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून उभारण्यात आलेल्या मालवण येथील नवीन जेटीचे उदघाटन ३० नोव्हेंबर पर्यंत करून पर्यटकांसाठी जेटी खुली करण्याचे नियोजन करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार मालवण जेटी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्याच्या सूचना मेरिटाईम बोर्ड ला देण्यात आल्या. याबाबत प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करून लवकरात लवकर याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करेल असा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा उभारण्यात येईल असे अमित सैनी यांनी स्पष्ट केले.
