*⚡सावंतवाडी ता.०६-:* श्री देवी सातेरी देवस्थान कमिटी कोलगावच्यावतीने नवरात्रोत्सवानिमित्त श्री देवी सातेरी मंदिर येथे गुरुवार ११ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळाच्या पौराणिक नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. या नाट्यप्रयोगात आनंद कोरगावकर, विघ्नराजेंद्र कोंडुरकर, संतोष चाळके, पंढरी घाटकर, प्रथमेश खवणेकर, राजू हर्याण, संतोष गावडे, ग्यारी कामतेकर, नितीन फडके, विष्णू नाईक आदी दशावतारी कलाकार सहभागी होऊन आपली कला सादर करणार आहेत. त्यांना हार्मोनियम- आशिष तवटे, पखवाज- पियुश खांदारे, तालरक्षक- विनायक सावंत संगीतसाथ करणार आहेत. नाट्यपेमींनी या नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देवी सातेरी देवस्थान कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.
कोलगाव येथे ११ ऑक्टोबर रोजी दशावतारी नाट्यप्रयोगाचे आयोजन
