Headlines

आयी केंद्रातील दोन विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयासाठी निवड

*⚡दोडामार्ग ता.०६ सुमित दळवी-:* जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वझरे हळदीचा गुंडा या शाळेतील विद्यार्थीनी कुमारी खुशी तुषार पवार हिची व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आयी न. १ या शाळेचा वेदांत ठाकूर याची सन २०२१-२२या शैक्षणिक वर्षासाठी जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. चालूवर्षी ११ऑगस्ट रोजी जवाहर नवोदय विद्यालासाठी इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांची निवड करणेसाठी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते .या स्पर्धेत जिल्हाभरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.देशभरातील नवोदय विद्यालयात सहावीच्या प्रवेशासासाठी अखिल भारतीय स्तरावरील प्रवेश प्रक्रिया म्हणून नवोदयची प्रवेश परीक्षा घेतली जाते.ही परीक्षा इंग्रजी ,हिंदी आणि प्रादेशिक भाषांमध्ये घेण्यात येते. मनुष्यबळ विकास मंत्रालय मार्फत राबविल्या जात असलेल्या या विद्यालयात सहावीत निवड झालेल्या विद्यार्थ्याला बारावीपर्यंतचे शिक्षण मिळते. खुशीला मुख्याध्यापक पी. डी. कोळी सर ,वर्गशिक्षक तुषार पवार व पालकांचे मार्गदर्शन मिळाले. तसेच वेदांत ठाकूर याला मुख्याध्यापिका श्रीमती पणशीकर मॅडम, अरविंद गवस सर,, वर्गशिक्षक प्रभाकर राठोड सर, झोरे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. खुशी व वेदांत यांचे यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमेश ठाकूर, आनंद गवस , केंद्रप्रमुख श्रीमती लोंढे मॅडम, विस्तार अधिकारी श्रीमती दीपा दळवी मॅडम व बाळकुंद्री मॅडम, गटशिक्षणाधिकारी नदाफ यांनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page