चौके- गोड्याचीवाडी येथील वळणावर चिरेवाहतुक करणारा ट्रक पलटी

चालक किरकोळ जखमी, वाहनाचे मोठे नुकसान

*⚡मालवण ता.०६-:* मालवण तालुक्यातील नांदरुख येथील चिरेखाणीवर चिरे भरून चौके – कुडाळ मार्गे बेळगांव- कर्नाटक येथे चिरे घेऊन जाणारा एलपी ट्रक (क्रमांक . के ए – २२ सी- ५६८८) कासार टाका येथील उतारावर आला असता चालकाचा ट्रक वरील ताबा सुटल्याने ट्रक दरीत कोसळून ट्रकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले सुदैवाने जिवीत हानी झाली नाही हा अपघात मंगळवार दि ५ ऑक्टोबर रोजी रात्रौ १० वाजण्याच्या सुमारास झाला. या संबंधीचे अधिक वृत्त असे की, नांदरुख येथील चिरेखाणीवरून चिरे भरून एल पी ट्रक हा मंगळवारी चौके – कुडाळ मार्गे बेळगांव- कर्नाटक येथे जात होता हा ट्रक चौके- गोड्याची वाडी बसथांब्यानजिकच्या कासारटाका उतारावर आला असता अचानक चालकाचा ट्रक वरील ताबा सुटला व तो पलटी होत दरीत कोसळला त्यामुळे ट्रकच्या हौद्यातील चिरे सर्वत्र विखुरले होते या अपघातात ट्रक चालक सुदैवाने बचावला असून किरकोळ जखमी झाला होता .एलपी ट्रकचे मोठे नुकसान झाले.

You cannot copy content of this page