प्राथमिक स्वरूपात 30 महिलांना केले वाटप
वेंगुर्ला प्रतिनिधी-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे सुरु असलेल्या सेवा व समर्पण अभियानांतर्गत वेंगुर्ला तालुक्यातील १०० महिलांना शिलाई मशिनचे वाटप करण्यात येणार आहे. याचा शुभारंभ परबवाडा येथील ग्रामपंचायत सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या माध्यमातून मानव विकास साधन संस्था जणशिक्षण विकास संस्था आणि परीवर्तन केंद्र सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून सेवा व समर्पण अभियानांतर्गत वेंगुर्ला तालुक्यात १०० महिलांना शिलाई मशिनचे वाटप करण्यात येणार आहे. त्यापैकी परबवाडा, मातोंड व वजराट येथील ३० महिलांना प्राथमिक स्वरुपात या शिलाई मशीनचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला जि.प.सदस्य दादा कुबल, परीवर्तन जिल्हा संयोजक विलास हडकर, परबवाडा सरपंच पप्पू परब, भाजपचे तालुका उपाध्यक्ष बाबली वायंगणकर, बाळा सावंत (खानोली), ज्ञानेश्वर केळजी, भूषण आंगचेकर, वेताळ प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष नाना राऊळ, महेश राऊळ, सद्गुरु सावंत, माजी सभापती सुचिता वजराठकर, परबवाडा येथील रामेश्वर महिला संघाच्या पदाधिकारी अॅना डिसोजा, नयना सावंत, दर्शना परब आदी उपस्थित होते.
