रस्त्यावरील खड्ड्यांना नगरपरिषदेचा भोंगळ कारभार जबाबदार

सामाजिक कार्यकर्ते अँड मनीष सातार्डेकर यांचा आरोप

वेंगुर्ला प्रतिनिधी- भूमिगत वीजवाहिनी तसेच गॅस पाईप लाईन घालण्यासाठी शहरातील खोदलेले रस्ते पूर्ववत केले नसल्याने ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्डयांमुळे अपघातही होत आहे. त्यामुळे याला सर्वस्वी वेंगुर्ला नगरपरिषदेचा भोंगळ कारभार व संबंधित अधिकारी हेच जबाबदार असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अॅड.मनिष सातार्डेकर यांनी केला आहे. शहरातील रस्ते केवळ दगड माती घालून नाही तर, खडी व डांबर घालून त्वरित बुझवावेत तसेच खड्यांसाठी जबाबदार असणा-या ठेकेदारांवर व संबंधित अधिका-यांवर मुख्याधिका-यांनी त्वरित कारवाई करावी असेही अॅड.सातार्डेकर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

You cannot copy content of this page