खटले लोक न्यायालयातर्फेच सोडवा-का.हु.शेख

*⚡वेंगुर्ला ता.०६-:* न्यायापासून वंचित असलेल्यांना न्याय देणे हे तालुका विधी सेवा समितीचे काम आहे. त्यासाठी दर दोन महिन्यांनी लोक न्यायालय भरविली जातात. या न्यायालयात सुटणारे खटले हे कायमचे असतात. त्यामुळे प्रलंबित खटले लोक न्यायालयामार्फत सोडवावेत, असे आवाहन तालुका विधी सेवा समिती वेंगुर्लेचे का.हु.शेख यांनी केले. वेंगुर्ला येथील नगरपरिषदेच्या सभागृहात ४ ऑक्टोबर रोजी तालुका विधी सेवा समिती वेंगुर्लातर्फे कायदेविषयक सल्ला शिबिर घेण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप, नगरसेवक प्रशांत आपटे, अॅड.वेंगुर्लेकर, न्यायायालयाचे अधिक्षक एस.नाईक उपस्थित होते. आज सर्वसामान्य लोकांना आपल्याला न्याय मिळणार नाही अशी मानसिकता झाली आहे. न्याय हा सर्वांसाठी आहे, तर तसा कायदा करणे गरजेचे होते. म्हणून १९८७ साली तसा कायदा करण्यात आला असल्याची माहिती शेख यांनी दिली.

You cannot copy content of this page