मालवण (प्रतिनिधी) गांधी जयंतीच्या निमित्ताने भाजप ओबीसी मोर्चा तर्फे मुंबई टिळकनगरमध्ये लोकमान्य टिळक मैदान ते सहकार सिग्नल पर्यंत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. बी. एम.सी एम प्रभाग यांच्या साहाय्याने ओबीसी मोर्चाचे मुंबई महामंत्री गुरुनाथ मिठबावकर यांनी हे स्वच्छता अभियान आयोजित केले होते. यावेळी ओबीसी मोर्चा मुंबई अध्यक्ष नरेन गावकर मुंबई अध्यक्ष, नगरसेवक सुषम सावंत, ओबीसी मोर्चा मुंबई महामंत्री गुरूनाथ मिठबा़वकर, प्रकाश चौधरी, मनोज जैस्वाल, अमित साताडेँकर, रवि घाग, हेमंत जाधव, संतोषमामा, वंदा लाड इतर ओबीसी पदाधिकारी, तसेच बी.एम.सी. अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
गांधी जयंती निमित्त भाजप ओबिसी मोर्चा तर्फे स्वच्छता अभियान मोहीम संपन्न
