मळेवाड कोंडूरा सरपंच हेमंत मराठे यांच्या मागणीला यश
सावंतवाडी — मळेवाड कोंडुरे सरपंच हेमंत मराठे यांच्या मागणीला यश आले असून सातार्डा शिरोडा ही कॉलेज v शाळेतील मुलांसाठी बस फेरी सुरू करण्यात आली आहे. गेल्या दीड ते पावणे दोन वर्ष कोरोना महामारी मुळे शाळा व कॉलेज बंद होती. मात्र सद्यस्थितीत कोरोना चा प्रभाव कमी झाल्याने शासनाने पुन्हा शाळा व कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घेतला.शाळा व कॉलेज बंद असल्याने यांच्या वेळेत सुटणाऱ्या एसटी बसेस एस टी प्रशासनानकडून बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र कॉलेज सुरू होऊनही बसफेऱ्या सुरू न केल्याने विद्यार्थ्यांना पायपीट करून शाळा व कॉलेजमध्ये खाजगी वाहनांचा आधार घेऊन जावे लागत होते.यामुळे मळेवाड कोंडूरे सरपंच हेमंत मराठे यांनी वेंगुर्ला आगार प्रमुख व शिरोडा स्टँड इन्चार्ज यांना निवेदन देऊन एस टी बस फेरी सुरू करण्याची मागणी केली होती. शिरोडा कॉलेज व शाळेत जाणाऱ्या सातार्डा, साटेली,आरोस, कोंडुरे, दांडेली, मळेवाड,आजगाव या भागातील विद्यार्थ्यांना एसटी नसल्याने गैरसोय होत होती याकडे निवेदन देऊन लक्ष वेधले होते.अखेर आज एसटी प्रशासनाकडून मराठे यांनी दिलेल्या निवेदनानंतर सातार्डा शिरोडा ही कॉलेजच्या मुलांसाठी ची बसफेरी उद्यापासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.तरी कॉलेज व शालेय विद्यार्थ्यांनी या बस फेरीचा लाभ घ्यावा असे आवाहन एसटी प्रशासनाने केले आहे.
