रक्तदात्या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क मिळावे

काँग्रेस जिल्हा सरचिटणीस राजू मसुरकर यांची मागणी

*⚡सावंतवाडी -:एनसीसी, एनएसएस मध्ये प्रोत्साहन देण्यासाठी ज्या प्रमाणे ग्रेस मार्क दिले जातात. त्याच प्रमाणे रक्तदात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन रक्तदान करणाऱ्या युवक युवतींना ग्रेस मार्क देण्यात यावेत. अशी मागणी सावंतवाडीतील सामाजिक कार्यकर्ते तथा जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजू मसुरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. असा उपक्रम राबविल्यास रक्ताचा तुटवडा निर्माण होणार नाही. आणि अनेक युवक युवती रक्तदानासाठी स्वयंस्फूर्तीने पुढे येतील. असे मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

You cannot copy content of this page