*⚡कणकवली ता.०५-:* सारस्वत कॉ.ऑप. बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडीसाठी झालेल्या निवडणुकीत गौतम एकनाथ ठाकूर यांनी यश मिळविल्याबद्दल आम. वैभव नाईक यांनी मुंबई येथील सारस्वत भवन येथे त्यांची भेट घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. एकनाथ ठाकूर यांनी केलेल्या कार्याप्रमाणेच गौतम ठाकूर यांनी जनहिताची कामगीरी करावी अशी अपेक्षा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेची आहे. आणि गौतम ठाकूर नक्कीच त्या अपेक्षा पूर्ण करतील याची खात्री असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी यावेळी बोलताना सांगितले.
सारस्वत बँक निवडणुकीतील यशाबद्दल गौतम ठाकूर यांचे आ.वैभव नाईक यांनी केले अभिनंदन
