कळणे मायनिंग नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईबाबत अधिकाऱ्यांशी केली चर्चा

.तर १६ तारीखला होणारे पुढील आंदोलन स्थगित करणार:परशुराम उपरकर

*⚡सावंतवाडी ता.०५-:* कळणे मायनिंगच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याबाबत जिल्हाधिकारी आणि मायनिंग अधिकाऱ्यांशी बोलणे झाले आहे. या दोन दिवसांत ५० टक्के नुकसान भरपाई मिळणार असून उर्वरित ५० टक्केबाबत तारीख अद्याप दिली नाही. त्यामुळे ८ तारीखला होणार आंदोलन स्थगित करून नुकसान भरपाई प्राप्त झाल्यानंतर उर्वरित नुकसान भरपाई कधी मिळणार याचे लेखी पत्र संबंधितांकडून मिळावे, ते पत्र आल्यास १३ तारीखला होणारे पुढील आंदोलन स्थगित करू किंवा जिल्हाधिकारी यांची भेट घेऊ अशी माहिती पत्रकार परिषदेत मनसे नेते माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिली‌. यावेळी संकटात मदतीला धावून आलेल्या माजी आमदार परशुराम उपरकर यांचा कळणे वासियांनी सत्कार करण्यात आला. यावेळी मनसे शहराध्यक्ष आशिष सुभेदार, संतोष भैरवकर, कळणेवासिय उपस्थित होते.

You cannot copy content of this page