त्या अपघातातील दोघांचा मृत्यू

मुलगी उपचाराखाली:काल भरधाव वेगाने धावणाऱ्या कारमुळे झाला होता अपघात

मालवण दि प्रतिनिधी जेवण आटोपून घरी जाणाऱ्या तिघा पादचाऱ्यांना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या मारुती सुझुकी एस प्रेससो कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ठाणे पालघर येथील पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक दिपक पुरुषोत्तम लोणे (वय ५७ ) रा आचरे वरचीवाडी आणि आचरा येथील स्वामी मठाचे आचारी जमेंदर प्रसाद (वय ५० ) मूळ राहणार बिहार पहाडपूर या दोघांचा कणकवली येथे खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर त्यांच्या सोबत असणारी दीपक लोणे यांची मुलगी परी ( वय १७ ) ही कणकवली येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे हा अपघात रविवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास आचरा मालवण या हमरस्त्यावरील आचरे हायस्कुल समोरील रस्त्यावर घडला आहे दरम्यान, कार चालक कृष्णा राणे रा जानवली तालुका कणकवली याच्या विरोधात आचरे पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे तर अपघातास कारणीभूत ठरलेली मारुती सुझुकी एस प्रेससो कारही आचरा पोलीसांनी ताब्यात घेतली आहे. काल रविवारी आचऱ्याला सुट्टी वर आलेले लोणे हे रात्री सव्वा दहाच्या सुमारास आचरा तिठा येथून जेवण आटोपून आपली मुलगी परी व मठाचे आचारी जमेंदर प्रसाद यांच्या सह पायी घरी जात असताना पाठीमागून आलेल्या भरधाव कारने तीघांनाही जोरदार धडक दिली .अपघाताची खबर समजताच गौरव पेडणेकर, विलास आचरेकर, दीपक आचरेकर, निलेश राणे,विक्रांत राणे, आचरेकर, साजित नायर,छोटू पांगे आदींनी धाव घेत जखमींना गौरव पेडणेकर यांच्या रिक्षेने आचरा प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविले. या अपघातात पोलीस उप निरीक्षक दीपक पुरुषोत्तम लोणे यांच्या डोक्याला कंबरेला गंभीर दुखापत झाली,मठाचे आचारी जमेंदर प्रसाद यांच्या डोक्याला व डाव्या पायाला तर लोणे यांची मुलगी परी दीपक लोणे हिच्या डाव्या हाताच्या कोपराला व पोटाला दुखापत झाली. गंभीर दुखापतीमुळे तिघांनाही अधिक उपचारासाठी रात्री कणकवली येथे हलविण्यात आले होते. मात्र यात दीपक लोणे व जमेंदर प्रसाद यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.याबाबत आचरा पोलीस स्टेशनला भरधाव वेगाने कार चालवून अपघातास कारणीभूत ठरल्या प्रकरणी मारुती सुझुकी एस प्रेससो एम एच ०७ ए जी ४०२५ कारचालक क्रूष्णा राणे यांना आचरा पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच अपघातास कारणीभूत ठरलेली कारही आचरा पोलीसांनी ताब्यात घेतली आहे. दीपक लोणे यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली भाऊ असा परीवार आहे.तर जमेंदर प्रसाद यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे, दोन मुली भाऊ,बहिण असा परीवार आहे. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हेड काँन्स्टेबल महेश देसाई करत आहेत.

You cannot copy content of this page