कोरोनाने मृत झालेल्या मृतांच्या नातेवाईकांना मनसेच्या माध्यमातून 1399 शोकसंदेशाची पत्रे

मनसे सरचिटणीस माजी आम.परशुराम उपरकर यांनी केले सांत्वन

*⚡कणकवली ता.०४-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोना आजारामुळे मृत झालेल्या सर्व मृतांच्या नातेवाईकांना मनसेच्या माध्यमातून सुमारे 1399 शोक संदेशाची पत्रे पाठवित मनसे सरचिटणीस माजी आम.परशुराम उपरकर यांनी सांत्वन करण्याचा तसेच धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. या शोकसंदेशात मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी म्हटले आहे की,आपल्या कुटुंबातील व्यक्तीची कोरोनामुळे दुःखद निधनाची काही दिवसापूर्वी बातमी ऐकून फार दुःख झाले . त्यांच्या निधनामुळे आपल्या कुटुंबियांचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे . त्यांचे अस्तित्व आपल्याला सतत जाणवत राहणार आहे . कुटुंबाचा आधार हरपल्याने तुमच्या जीवनात एक पोकळी निर्माण झालेली आहे . अशा प्रसंगी कोरोनाच्या संसर्गामुळे आम्ही आपल्याकडे प्रत्यक्ष येऊन सांत्वन करू शकलो नाही , याची आम्हांला खंत वाटते . आपल्या दुःखद प्रसंगात आपल्याकडून हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेली वैद्यकिय बिलांची भरमसाठ आकारणी व दवाखान्यातील दुरावस्था यामुळे आपल्याला आर्थिक आणि मानसिक त्रास सोसावा लागलेला आहे . त्यांच्या आत्म्यास चिरशांति लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना . मी स्वतः व आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे ,माझे सहकारी आपल्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत . ईश्वर या धक्क्यातून सावरण्याची आपणांस व आपल्या कुटुंबियांस शक्ति देवो असे या शोकसंदेशात परशुराम उपरकर यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page