चिपी विमानतळाच्या “हाउसकीपिंगचा”ठेका घेण्यासाठी खास. विनायक राऊत यांची धडपड

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांचा आरोप; जनतेची फसवणूक सहन करणार नाही

*⚡कणकवली ता.०४-:* जनतेचा खास. विनायक राऊत यांच्यावर काढीचाही विश्वास राहिलेला नाही.मुंबई-गोवा महामार्गच्या टोल वसुलीचं कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी खास. विनायक राऊत यांनी ठेकेदाराला मदत केली आणि टोलचा ठेका घेतला.आता चिपी विमानतळाच्या पाहाणीचा आणि उदघाटन कार्यक्रमाचे निमित्त काढून हाउसकीपिंग आणि आऊटसोर्सिंगचा ठेका घेण्याच्या प्रयत्नात आहेत. चिपी विमानतळाच्या हाऊसकिपिंगच्या ठेक्यासाठी बेनामी ठेकेदार कंपनी आणून हे ठेके पदरात पाडण्याचा प्रयत्न चालू आहे.असा गौप्यस्फोट मनसे नेते माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला. मनसे नेते परशुराम उपरकर यांनी कणकवली जिल्हा कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन खासदार विनायक राऊत यांच्यावर टीका केली.ते म्हणाले, चिपी विमानतळ व्हावे आणि त्यात आपल्या मुलांना रोजगार मिळावा यासाठी स्थानिक जनता आग्रही आहे मात्र या विमानतळावर लागणारा कर्मचारी वर्ग कंपनीचा असेल तर फायदा स्थानिकांना होईल मात्र येथे खासदार विनायक राऊत याच हाऊस किपिंग आणि आऊटसोर्सिंगचा ठेका स्वतःच्या पदरात पाडून घेत आहेत.त्यासाठी जवळचे नातेवाईक आणि बेनामी ठेकेदार उभे करत आहेत. केंद्राचा प्रकल्प आणि स्वतः खासदार आहेत म्हणून कंपनीवर दबाव आणून ठेके पदरात पाडण्याचे काम सुरू आहे.हे थांबले नाही तर मनसे आंदोलन करेल आणि स्थानिकांना न्याय मिळवून देईल असा इशारा श्री. उपरकर यांनी व्यक्त केला. राजकिय फसवणूक जिल्हात चालूच आहे खासदार विनायक राऊत यांनी आंजिवंडे घाटाची घोषणा केली.मात्र वाईल्ड लॅब चा दाखला सोनवडे घाटाला मिळाला काय ? मग आंजिवंडे घाटाला कसा मिळणार ? मात्र तेथील आमदार वैभव नाईक सुद्धा अशा न होणाऱ्या गोष्टीचे श्रेय घेण्यासाठी पुढे आहेत. खासदार आणि आमदार सातत्याने जनतेवर अन्याय करण्याचं काम करतायेत. खासदारांना सध्या विसरळूपणाचा आजार झालेला आहे. स्वतः पक्षाचे सचिव असताना ते आपल्या पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत, हेच ते विसरले. यावरून खासदार मागचं विसरतात आणि पुढचं लक्षात ठेवतात. त्यामुळे स्थानिकांना दिलेलं रोजगाराच आश्वासन खासदार आणि विमानतळ प्रशासन विसरले, तर मनसे स्थानिकांच्यावतीने आंदोलन करेल, असा इशारा परशुराम उपरकर यांनी दिला आहे. शासनाकडे खड्डे भरायला निधी नसतांना मतदारांना फसवून श्रेयासाठी घाट मार्ग होणार म्हणून घोषणा कसल्या करता ?असा सवालही यावेळी परशुराम उपरकर यांनी केला.

You cannot copy content of this page