तुमच्याच हातीत जिल्ह्याचे भविष्य स्वच्छतेचा अभिप्राय नोंदवा

जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांचे जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन

*⚡ओरोस ता.०४-:* स्वच्छ सर्वेक्षण ग्रामिण मध्ये जिल्ह्याला प्रथम क्रमांकाचे नामांकण मिळणे हे जिल्हावासियांच्या हातात असुन यासाठी जिल्हावासिंयांनी स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2021 मोबाईल ॲपच्या माध्यमातुन प्रतिक्रिया नोदवाव्यात असे आवाहन श्रीम. के. मंजुलक्ष्मी, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी केले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा स्वच्छता प्रिय जिल्हा आहे. घराघरात निर्माण होणा-या कचरा व सांडपाण्याचे नियोजन घरगुतीस्तरावर येथे करण्यात येते. जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन बाबत गाव निहाय स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत काम सुरु करण्यात आले आहे. आपण जिल्ह्यात स्वच्छतेच्या बाबीत केलेल्या कामाचे मुल्यांकण स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2021 अंतर्गत होणार आहे. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामिण मध्ये जिल्ह्यातील सर्व ग्रामपचायतीचा सहभाग असुन ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सार्वजनिक ठिकाणे उदा. शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र, धार्मिक स्थळे, बाजाराची ठिकाणे या ठिकाणची स्वच्छते संदर्भातील सध्यस्थितीची पडताळणी होणार असुन, या पडताळणीच्या माध्यमातुन जिल्ह्याला 300 पैकी गुण देण्यात येणार आहेत. तसेच स्वच्छ भारत मिशन ग्रामिण अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2021 मध्ये नागरीकाचा सहभाग नोंदविण्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर SSG21 हे ॲप सुरु करण्यात आले आहे. या ॲपच्या माध्यमातुन गावातील सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छता सुविधा यावरील प्रश्नाची उत्तरे ग्रामस्थांना द्यावयाची आहेत. ग्रामस्थांनी मोबाईल ॲपच्या माध्यमातुन नोंदविलेल्या प्रतिक्रियांच्या माध्यमातुन जिल्ह्याला 350 पैकी गुण मिळणार आहेत आपला जिल्हा स्वच्छतेच्या क्षेत्रात कायम अव्वल राहिला आहे. जिल्हावासियांनी मोबाईल ॲपच्या माध्यमातुन आपले मत नोंदवुन जिल्ह्याला स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2021 पुन्हा एकदा स्वच्छतेच्या क्षेत्रात अग्रेसर ठेवावे असे आवाहन श्रीम. के. मंजुलक्ष्मी, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

You cannot copy content of this page