*⚡मालवण ता.०४-:* मालवण बाजारपेठ येथील भैरवी देवी बाळगोपाळ मित्रमंडळातर्फे नवरात्रोत्सवानिमित्त भजन महोत्सवाचे आयोजन ७ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत करण्यात आले आहे. यात रोज रात्री ८.३० वाजता एक भजन मंदिरात सादर होणार आहे. त्यानंतर रोज रात्री रास गरबा व दांडिया खेळण्यात येणार आहे. उद्घाटनादिवशी सुप्रसिद्ध डबलबारी भजनीबुवा समीर कदम यांचे भजन होणार आहे. तसेच युवा किर्तनकार ह. भ. प. दर्शन महेश वझे याच्याहस्ते भजन महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. सादर होणारी भजने- ७ रोजी लिंग- रवळनाथ भगवती प्रासादिक भजन मंडळ पोखरण (बुवा समीर कदम), ८ रोजी भद्रकाली प्रासादिक भजन मंडळ रेवंडी (बुवा सिद्धेश कांबळी), ९ रोजी ब्राह्मणदेव प्रसादिक भजन मंडळ आनंदव्हाळ (बुवा प्रदीप सामंत), १० रोजी श्री भवानी भजन मंडळ घुमडे वस्तवाडी (बुवा चंद्रशेखर वस्त), ११ रोजी ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळ कातवड (बुवा मंगेश नलावडे), १२ रोजी भूतनाथ प्रासादिक महिला भजन मंडळ (बुवा वैष्णवी (तळवडेकर). १३ रोजी मोरेश्वर प्रासादिक भजन मंडळ वायरी भूतनाथ (बुवा विठ्ठल मालंडकर), १४ रोजी श्री ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळ न्हिवे (बुवा राजन दळवी), १५ रोजी मोबारेश्वर भजन मंडळाचे खास आकर्षण दिंड्यापताकासह वारकरी भजन सादर होणार आहे. या महोत्सवाचे हे आठवे वर्ष आहे. उद्घाटन ह. भ. प. दर्शन वझे यांच्या हस्ते व नाभिक समाजाचे नेते विजय चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, शहर व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरुरकर, नगरसेवक दीपक पाटकर, उद्योजक अनिल मालवणकर, उद्योजक विजय केनवडेकर नाभिक समाज महिला जिल्हाध्यक्ष प्रतिभा चव्हाण, तालुकाध्यक्ष आनंद आचरेकर महिला तालुकाध्यक्ष दिपाली शिंदे आदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती बाळगोपाळ मंडळाचे अध्यक्ष अंकुश चव्हाण, जगदीश वालावलकर यांनी दिली.
भैरवी देवी मंदिरात भजन महोत्सव
