*⚡मालवण ता.०४-:* सप्टेंबर महिन्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी मालवणमधील १५३ वाहनचालकांवर ३१,२०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली. मालवण शहरात ट्रीपल सीट वाहन चालविणे, लायसन्स नसणे, नंबर प्लेट नसणे, नंबर प्लेट तुटलेली असणे, नो पार्किंग एरियात दुचाकी व चारचाकी लावणे, हेल्मेट नसणे, आरसी बुक, पीयूसी नसणे आदी प्रकरणी वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. मालवण भरड नाका व बाजारपेठ येथे वाहतूक पोलीस कर्मचारी गुरुप्रसाद परब, अमित हरमलकर यांनी ही दंडात्मक कारवाई केली.
मालवणात १५३ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई
