शेर्ले-निगुडे-सोनूर्ली रस्त्यासाठी उद्या उपोषण

*⚡बांदा ता.०३-:* तब्बल पन्नास लाख रुपये खर्चून निगुडे-सोनुर्ली रस्त्याचे काम करण्यात आले. परंतु सद्यस्थितीत रस्त्यावर धोकादायक खड्डे पडून मोरीपुलेही खचली आहेत. येथून खनिज कंपनीची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असून सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र याकडे कानाडोळा करत आहे. त्यामुळे भविष्यात होणारे अपघात टाळण्यासाठी आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही सोमवार 4 ऑक्टोबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे निगुडे सरपंच समीर गावडे यांनी सांगितले. तसे लेखी पत्रही त्यांनी संबंधितांना दिले आहे.

You cannot copy content of this page