निगुडेत शोषखड्डे मारण्यासाठी सर्वांनी जनजागृती करावी

सरपंच समीर गावडे यांचे आवाहन : ग्रामपंचायतमध्ये महात्मा गांधी जयंती साजरी

*⚡बांदा ता.०३-:* माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री व राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा या चारही महापुरुषांनी देशासाठी आपले पूर्ण आयुष्य वेचले व आज गावामध्ये या सर्वांचे विचार योगदान जसे महत्त्वाचे ठरते तसेच आपल्या गावाच्या विकासासाठी आपण सर्वांनी एकत्र यायला पाहिजे व आपला गाव स्वच्छ सुंदर राखूया गावामध्ये जास्तीत जास्त लोकांनी शोषखड्डे मारावे. यासाठी आपण स्वतः गावात फिरून जनजागृती करणार व आपला गाव विकासाच्या मार्गावर नेऊया, असे आवाहन निगुडे सरपंच समीर गावडे यांनी ग्रामस्थांना केले. माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस निगुडे सरपंच समीर गावडे यांनी पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी उपसरपंच गुरुदास गवंडे, ग्रामसेवक तन्वी गवस, ग्रामपंचायत सदस्या इशा तुळसकर, लक्ष्मी दळवी, समीक्षा गावडे, अंगणवाडी सेविका प्रियांका राणे, रंजना सावंत, नूतन निगुडकर मदतनीस विजयालक्ष्मी शिरसाट, लक्ष्मी पोखरे ग्राम रोजगार सेवक परेश गावडे, ग्रामस्थ जगदीश पवार, सुधीर गावडे, सिद्धिविनायक गावडे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page