भजनातुन जमलेल्या निधीतून केली गरजू वृद्धेला आर्थिक मदत

*⚡मालवण ता.०३-:* तारकर्ली गावातील बाळगोपाळांनी भजनातून जमलेल्या रक्कमेतून गरजू वृद्धेला मदत करून समाजासमोर पुन्हा एकदा एक आदर्श प्रस्थापित केला. सलग तिसऱ्या वर्षी या बाळगोपाळांनी हा उपक्रम राबवित गरजू व्यक्तीला मदत केली आहे. तारकर्ली गावातील रोहन नरेश कांदळगावकर, यज्ञेश वंदन केरकर , वेदांत सदाशिव सागवेकर , ईशान सदाशीव सागवेकर, प्रणित भार्गव कांदळगावकर, निनाद गणपत मोंडकर , रिषभ श्रीधर खराडे, हार्दिक सतिश टिकम, सिद्धेश नरेश टिकम, नैतिक धोंडी कांदळगावकर ,‌ रोहित बाळकृष्ण वरक, देवेश पराडकर या बाळगोपाळांनी गणेशोत्सवादरम्यान आपल्या बालभजन मंडळा मार्फत विविध ठिकाणी गणेश भजन केले. त्यातुन गोळा झालेल्या निधी मधील काही भाग तारकर्ली गावातील श्रीमती मीना महादेव बटा या गरजु महिलेस मदत म्हणुन दिला. त्यामुळे कोरोना काळात या महिलेचा आर्थिक भार काही प्रमाणात हलका झाला आहे. यापुर्वी सुद्धा या बाळगोपाळांनी रवि टिकम या आजारी तरूणाला आर्थिक मदत तसेच गावातील निराधार आणि गरजु महिलांना आर्थिक मदत केली होती व यासाठी‌ त्यांना कामानिमित्त सौदी अरेबिया येथे वास्तव्यास असलेल्या श्री. प्रदिप तोंडवळकर यांनी ५००० रूपयांचे प्रोत्साहनात्मक बक्षिस पाठवले होते .हे बाळगोपाळ आपल्या नकळत्या वयात सुद्धा अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवित असल्याने सध्या तारकर्ली पंचक्रोशीत त्यांचे कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page