*⚡मालवण ता.०३-:* मालवण येथील रजत तोरसकर आणि खुशी पेटे यांची १९ वर्षाखालील गटात सिंधुदुर्ग टेबल टेनिस संघामध्ये निवड झाली आहे. रजत व खुशी हे नाशिक जिमखाना नाशिक येथे ६ आक्टोबरपर्यत संपन्न होणाऱ्या ८३ व्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. खुशी पेटे ही १९ आणि २१ वर्षाखालील तर रजत १९ वर्षाखालील तसेच २१ वर्षाखालील आणि पुरुष खुल्या गटातही खेळणार आहे. महासिंधु टेबल टेनिस असोसिएशन जिल्हा सिंधुदुर्गचे सचिव श्री.हेमंत वालकर आणि अध्यक्ष श्री.विष्णू कोरगांवकर यांनी रजत आणि खुशी यांचे अभिनंदन करत राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
रजत तोरसकर व खुशी पेटे यांची सिंधुदुर्ग टेबल टेनिस संघात निवड
