सभेत दुध उत्पादकांना गणेश चतुर्थी निमित्त प्रोत्साहनपर भेटवस्तूचे वाटप
*⚡वैभववाडी ता.११-:* करूळ येथील रासाई दूध संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. या सभेत दूध उत्पादकांना गणेश चतुर्थी निमित्त प्रोत्साहनपर भेटवस्तू चे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष दिगंबर पाटील, माजी प.स. सदस्य बाळा कदम, तंटामुक्ती अध्यक्ष रवींद्र पवार, सुभाष पाटील, बबन डकरे, माजी सरपंच हिंदुराव पाटील, सचिव हेमंत पाटील व सभासद ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी दिगंबर पाटील म्हणाले, संस्थेच्या जडणघडणीत दुध उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा वाटा आहे. शेतकऱ्यांच्या हिताच्या शासनाच्या नवनवीन योजना येणाऱ्या काळात राबवल्या जातील. शेती विषयक माहिती शेतकऱ्यांना मिळावी यासाठी प्रशिक्षण व शिबिरे घेतली जातील. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे हाच संस्थेचा मुख्य उद्देश आहे. बाळा कदम म्हणाले, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीत करणे आवश्यक आहे. दुग्ध व्यवसाय हा शेतीला पूरक व्यवसाय आहे. या व्यवसायातून शेतकऱ्यांनी प्रगती साधली पाहिजे. रवींद्र पवार यांनी मनोगत व्यक्त केले. या सभेत शेतकऱ्यांच्या अडचणी, समस्या जाणून घेण्यात आल्या. तसेच कामकाजाचा आढावा घेण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार हेमंत पाटील यांनी मानले.
