दिवंगत शुभांगी उर्फ माई यादव यांची अभिवादन सभा १२ उद्या…

*⚡वैभववाडी ता.११-:* : वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघ ग्रामीण शाखेच्या अध्यक्षा व माता रमाई महिला मंडळाच्या अध्यक्षा दिवंगत शुभांगी उर्फ माई यादव यांची अभिवादन सभा १२ सप्टेंबर रोजी सकाळी 11वा डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक वैभववाडी येथे आयोजित करण्यात आली आहे. शुभांगी उर्फ माई यादव यांच २६ जून २०२१ ला आकस्मिक निधन झाले होते. त्यांच्या सामाजिक, धार्मिक चळवळीच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी कोविडचे सर्व नियम पाळून सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघाच्यावतीने कार्याध्यक्ष सुभाष कांबळे सरचिटणीस रवींद्र पवार यांनी केले आहे.

You cannot copy content of this page