Headlines

आचिर्णे रेल्वे स्थानकात युवासेनेकडून दिवा सावंतवाडी पॅसेंजर चे स्वागत

वैभववाडी प्रतिनिधी   आचिर्णे रेल्वे स्थानकात दिवा सावंतवाडी या पँसेजर गाडीच युवासेनेच्यावतीने स्वागत करण्यात आले.गाडीच्या मोटरमनच औक्षण करून युवासेनेच्यावतीने या गाडीतून उतरलेल्या प्रवाशांना मोफत घरपोच सेवा दिली.कोकणरेल्वे मार्गावर नव्याने झालेल्या आचिर्णे स्थानकात दिवा पँसेजर गाडीला थांबा देण्यात आला आहे. स्थानकात प्रथमच थांबलेल्या या गाडीच युवासेनेच्यावतीने जोरदार स्वागत करण्यात आले. युवासेनेचे जिल्हा प्रमुख गितेश कडू यांच्या यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला. बुधवारी सायंकाळी दिवा पँसेजर गाडी स्थानकात आल्यावर महीलांनी मोटरमनच औक्षण केले. त्यांना आरती ओवाळून पेढे वाटप केलेत.तसेच या गाडीतून आलेल्या प्रवाशांना मोफत घरपोच सेवा देण्यात आली. स्थानकात प्रथमच थांबलेल्या गाडीच जोरदार स्वागत झाले. यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख गितेश कडू,आचिर्णे विकास मंडळ अध्यक्ष प्रभानंद रावराणे,ग्रा.प.सदस्य सारीका कडू ग्रा.प.सदस्य सारिका रावराणे ,ग्रा.प.सदस्य सुहास गुरव खांबाळे गावचे उपसरपंच गणेश पवार ,मंगेश सुद ,ज्येष्ठ शिवसैनिक चंद्रकांत मटकर, प्रमोद कडू , संदीप कडू, रमेश चव्हाण, मनोहर कडू, चंद्रशेखर कडू ,संजय मजगावकर, रामा गुरव ,श्रीधर कडू ,मकरंत गुरव, बळीराम कडू, विश्वंभर कडू युवासेनेचे तुषार शिंदे, अक्षय कडू सिद्धेश कडू, रोहन रावराणे, महेश पवार, कल्पेश कडू, शिवनाथ कडू, सिद्धेश रावराणे, चंद्रकांत कडू, संतोष बोडके महेश कडू ,दीपक गुरव ,दत्ताराम कडू ,रुपेश कडू ,ग्रामस्थ व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page