वैभववाडी प्रतिनिधी मानव साधन विकास संस्था व जन शिक्षण संस्था सिंधुदूर्ग यांच्या माध्यमातून व माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रयत्नातून गोवा विमानतळ प्राधिकरण यांचे सीएसआर निधीतून मोफत सायकल बँक हा उपक्रम जिल्हाभर राबवण्यात येत आहे. वैभववाडी तालुक्यातील आचिर्णे येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयातील दहा विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास भाजप जिल्हा उपाध्यक्ष श्री.प्रमोद रावराणे, जि.प.सदस्य श्री.सुधीर नकाशे, आचिर्णे सरपंच श्री.रुपेश रावराणे, श्री.उत्तम सुतार, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष किशोर दळवी, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष राजू पवार, शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संदीप तुळसकर यांनी केले. तर सायकल प्रस्ताव बनविण्यासाठी विद्यालयातील शिक्षकांनी मेहनत घेतली. विद्यार्थिनींना सायकल मिळण्यासाठी आचिर्णे गावचे सुपुत्र श्री. उत्तम सुतार यांनी विशेष प्रयत्न केले. विद्यार्थी, पालक, विद्यालय, शाळा समिती व ग्रामस्थ यांच्यावतीने या उपक्रमाचे कौतूक केले जात आहे.
आर्चीणे येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयातील दहा विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप
