*⚡कुडाळ ता.०९-:* राणे परिवाराच्या संकल्पनेतून प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही सिंधुदुर्ग राजाचे अगदी थाटामाटात श्रीं.चा मंडपामध्ये आज आगमन झाले आहे. पिंगुळी काळेपाणी ते म्हापसेकर तिठा, गवळदेव, कुडाळ पोलीस स्टेशन ह्या मार्गे भारतीय जनता पार्टी पोस्ट ऑफिस समोर येथील सिंधुदुर्गच्या राजाचे आज 12 व्या वर्षी दरबारामध्ये आगमन झाले आहे. त्यावेळी उपस्थित कुडाळ माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे तालुका अध्यक्ष विनायक राणे,महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष संध्या तेरसे,ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष दीपक नारकर,कुडाळ माजी नगराध्यक्ष ओंकार तेली,युवा मोर्चा ता अध्यक्ष पप्या तवटे,सुनिल बांदेकर,राकेश नेमळेकर,नागेश नेमळेकर,साईनाथ म्हाडदळकर राजेश पडते,सोशल मीडिया जिल्हा संयोजक युवा मोर्चाचे राजवीर पाटील, राजा धुरी,प्रथमेश दळवी,भूषण राणे,तन्मय वालावकर,प्रसन्न गंगावणे,आनंद सूर्यवंशी, चिन्मय नेमळेकर, देवराज राणे,संदेश सुकळवाडकर,रवी पावसकर आदी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सिंधुदुर्ग राजाचे दरबारात जल्लोषी आगमन
