मालवण येथील आंबा व्यावसायिक कृष्णा गावकर यांचे निधन

*⚡मालवण ता.०८-:* मालवण वायरी गावकर वाडा येथील रहिवासी आणि आंबा तसेच कात व्यावसायिक कृष्णा गणपत गावकर वय ८३ यांचे आज सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास रेवतळे येथील निवासस्थानी अल्पशा आजाराने निधन झाले. श्री. कृष्णा गावकर हे मुंबई मध्ये सॉ मील येथून मशीन ऑपरेटर या पदावरून सेवानिवृत्त झाले होते. त्यानंतर त्यांनी मालवण येथे येऊन आंबा आणि कात यांचा व्यवसाय केला. कृष्णा गावकर हे शेतकरी ही होते . त्यांच्यावर दांडी मोरेश्वर वाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मालवण लायन्स क्लबचे अध्यक्ष आणि मातृत्व आधार फाऊंडेशन मालवणचे सेक्रेटरी श्री. विश्वास गावकर यांचे ते वडील होत.

You cannot copy content of this page