शासकीय कर्मचाऱ्यांना जिल्हा बँक देणार आगाऊ पगार

ओरोस-:कोकणातील गणेशोत्सव हा प्रमुख सण असून या कालावधीत मोठी आर्थिक उलाढाल होत असते. चालू वर्षी गणपती सण सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात आल्याने नोकरदारांना गणपती पूर्व सामान खरेदीसाठी पगार न झाल्याने पैशांची अडचण निर्माण झाली होती. जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांचे सेवेतील प्राथमिक शिक्षकांच्या मासीक पगार तसेच निवृत्तीवेतन धारकांचे कामकाज जिल्हा बँकेमार्फत करण्यात येते. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सिंधुदुर्ग या संघटनेने ऑगस्ट 2019 चे मासिक वेतन वेतन गणेशोत्सव म्हणजे १० सप्टेंबर २०२१ पूर्वी जमा होण्याची शक्यता नसल्याने ऑगस्ट 2019 च्या वेतनापोटी बँकेने आगाऊ स्वरूपात रक्कम द्यावी अशी विनंती केलेली होती. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त ग्रामसेवक संघटनेनेही आगाऊ रक्कम मिळण्याबाबत विनंती केली होती. सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त ग्रामसेवक संघटनेने सुद्धा आगाऊ रक्कम मिळण्याबाबत मागणी केली होती. बँकेच्या संचालक मंडळाने याबाबत सविस्तर चर्चा करून गणेशोत्सव कालावधीत नोकरदार व निवृत्तीवेतन धारकांची गरज लक्षात घेऊन मागील पगार एवढी किंवा जास्तीत जास्त पन्नास हजार ऍडव्हान्स रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. या रकमेची परतफेड सप्टेंबर 2019 मध्ये होणाऱ्या वेतन, निवृत्ती वेतन यामधून करण्यात येणार आहे. तोपर्यंत देण्यात आलेली रक्कम बिनव्याजी असणार आहे. यासाठी वेतनधारक, निवृत्तीवेतन धारक यांनी आपले वेतन मिळण्यासाठी संबंधित जिल्हा बँकेशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी केली आहे.

You cannot copy content of this page